दशधर्माची-आरती

Author:- –

Language : Marathi

Rhythm: –

Type: Pooja

Particulars: Dashkashan Pooja

||दशधर्माची माहिती-आरती||

भव्य जिवांनो! भावे ऐका, महती दशविध धर्माची सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ।

वंदे श्रीजिनम् । वंदे श्रीजिनम् ॥ घृ. ॥

क्षमाक्रोध जिंकणे क्षमाभाव हा, रागद्वेष ही जिथे नसे

विश्व प्रेमाचा हा ठेवा, आत्म्याचा निजधर्म असे वैर वाढती क्रोध महारिपु,

दुर्गतिचे जे वीज असे सोड वैर नी समता धरि रे,

सुचिर शांति जी देत असेक्षमा असे ही ‘परम अहिंसा’, शुद्ध परिणती जीवाची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥ वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥घृ॥ १॥

मार्दवअहंकार मद मान सोडणे, मार्दव गुण हा मनी घरी मी मोठा अन् तुच्छ सर्व हे व्यर्थ असा का मान करी? क्षणभंगुर धन यौवन आदिक,

गर्व मनीचा दूर करी विनय करी रे गुणी जनांचा, अंगि नम्रता सदा घरी-मार्दव गुण हा आत्म्याचा की,

गुरूकिल्ली ही ज्ञानाची सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥ वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥घृ॥२॥

आर्जव आर्जव ऋजुता परिणामांची, मायाशल्य जिथे न वसे मन-वच तनुची सरल सत्यता, आर्जव भावहि तिथे वसे कुटिलपणाची कंपटरीति ही,

अंती घातक होत असे ‘जसे करावे तसे भरावे,’ हाच न्याय की जगी असे आर्जव जेथे तिथे अहिंसा, शुध्द भावना आत्म्याची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥ वंदे श्रीजिनम् । वंदे श्रीजिनम् ॥धृ.॥ ३॥

शौच शौच धर्म ही अंतर्शुचिता, लोभादिक मल जिथे नसे गंगा जमुना स्नानानेही,

आत्मा निर्मल होत नसे दुःखमूळ हा लोभ असे की, पापांचा सरदार असे तृष्णाविष नित दाह वाढवी,

व्याकुळ होऊन जीव फिरे संतोषामृत शांती देई, शुचिता करिते आत्म्याची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी बीर जिनेशाची ॥।वंदे श्रीजिनम् । वंदे श्रीजिनम् ।। घृ. ॥४॥

सत्य सत्यरूप जे आत्म्याचे ते, सत्यधर्म हा दावित से वस्तूंचे सद्रूप असे जे,

तसेच वदणे सत्य असे प्रिय मित हितकर वचन असावे, अमृतसम जे मधुर असे सत्य सरळ व्यवहार असावा,

सत्य सदा जयवंत असे सत्य चिरंतन शाश्वत असते, कास धरावी सत्याची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥ धृ. ॥५॥

संयम इंद्रियनिग्रह संयम जाणा, विषयांचा अनुराग तसे जीवमात्र सर्वांचे रक्षण, दया भावना जिथे वसे जपा जपा रे,

संयमभूषण, विषयचोर त्या लुटत चारित्र्याचे पालन करिता, संयम-दृढता येत असे संयम धारण करि हे मनुजा,

हीच वाट रे मोक्षाचा सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥ धृ. ॥६॥

तपनिरोध करणे इच्छेचा हे, उत्तम तप जगि श्रेष्ठ असे ज्ञान सहित हे तप आचरितां, कर्म-निर्जरा होत असे देवांनाही दुर्लभ तप हे,

मनुजा तुजला सुलभ असे मनुज जन्म हा दुर्लभ लाभे, व्यर्थ असा का दवडित से विषयराग सोडूनि तप तपता, तुटे श्रृंखला कर्माची सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥ धृ. ॥७॥

त्याग रागरोषमद विकार त्यजणे, उत्तम त्याग महान असे सत्पात्राला दान करावे, लोभ मान मद ज्यात नसे धनसंपत्ति ही नश्वर जाणा,

दानाने ती सफल असे त्यागाविन हे जीवन निष्फळ, त्यागधर्म जगिx श्रेष्ठ असे उत्तम त्याग करावा निशिदिनि, मिळे संपदा मोक्षाची सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥ धृ. ॥8॥

आकिंचन्य उत्तम आकिंचन्याह जेथे, परिग्रह चिंता लेश नसे निर्ममत्व या देहावरिही, शुद्ध भावना जिथे असे अंतर्बाह्य परिग्रह त्यजुनी,

निजरूपी लवलीन असे मी न कुणाचा कुणी न माझा, ज्ञानवंत मी शुद्ध असे अशी भावना असे निरंतर, पहा अकिंचन धर्माची सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची .

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥ धृ. ॥9॥

ब्रह्मचर्य परद्रव्यांचा संग सोडूनी, निजरूपी नित रत असणे उत्तम ब्रह्मचर्य त्या वदती, विषयांची आशा नसणे विषय-वासना मूढ करी मति,

विवेक-तरू हा जाळतसे भोग महा भवदाह वाढवी, इंद्रियसुख हे क्षणिक असे शील सदा दृढ पालन करि रे, शीलसंपदा आत्म्याची सुखमय

सुखमय मंगलकारक विजयी, वाणी वीर जिनेशाची ॥वंदे श्रीजिनम्। वंदे श्रीजिनम् ॥ धृ. ॥10॥

You cannot copy content of this page